मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

समुद्रायन

निसटणाऱ्या वाळूत घट्ट रोवलेले पाय जरासे सैल करत मी स्वत:ला माझ्याकडे धावत येणाऱ्या त्या फेसाळत्या शुभ्र लाटेच्या स्वाधीन केलं.. ती आवेगाने येऊन बिलगली पायांना.. मी डोळे मिटले.. क्षणभर, अगदी क्षणभरच तिच्यावर तरंगत असल्याचा फील आला.. ती अवस्था मनात साठवेतो लाट निघूनही गेली परतून.. आणि माझे पाय पुन्हा वाळूत रुतले.. समोर मावळतीचा सूर्य त्याचा तो क्षितीजावरचा रंगसोहळा मिरवत होता.. शांत, नीरव किनारा.. फारशी गर्दी नसणारा.. तिथली माझी खडकाजवळची ती आवडती जागा.. आणि लाटांसोबत चालू असलेला आवडीचा खेळ! येणाऱ्या प्रत्येक लाटेगणिक शहारणारी आणि जाणाऱ्या लाटांनी हलकी हलकी होत जाणारी मनाची अवस्था.. शेक्सपिअरच्या ओळी मग ओठांवर येतात, Come unto these yellow sands, And then take hands: Curtsied when you have, and kiss’d The wild waves whist, Foot it featly here and there; And, sweet sprites, the burthen bear. मन अजून अजून खोल जात राहतं. सरणाऱ्या वाळूवर मागे राहणारे शिंपले खुणावतात.. तो ओल्या वाळूचा कॅन्व्हास बोलावत असतो.. पण, त्यावर काही रेखावसं वाटत नाही. निमिषात ते पुसून जाणार असतं.. fading things often

नवीनतम पोस्ट

बहती हूं मै ..

नक्षत्र-बाधा

The 3 AM callings

संपी आणि तिचं धमाल जग : भाग ४२

अमलताश

ओढाळ मन..

संपी आणि तिचं धमाल जग : भाग-४१

संपी आणि तिचं धमाल जग : भाग ४०