..भैरवी!जुन्याच वाटा.. जुनीच वळनं..
जुन्याच पागोळ्यांचं पुन्हा पुन्हा ओघळणं

न पुसता येणारे मनाचे भास,
अन न खोडता येणारी स्वत:चीच चित्रं..

भरून गेलय थेंबांनी ओंजळीतलं तळं,
थकून गेलय मन, वेचून तीच तीच निर्जीव फुलं..

एकाच सुराला रोज रोज आळवनं,
अन एकच चित्र रोज रोज रंगवण..

रूसले रंग अन रूसले सूरही..
हरऊन गेलं अस्तित्वाचंच गाणं..!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट