सरस्वती

वळणावळणांचा हा घाट
ढगांतूनी काढत वाट
शोधत असते मीही काठ,
झुळझुळणाऱ्या सरस्वतीचे..

गोड तिचं पाणी
गार तिचा स्पर्श
स्वर्गाहुनी असे खास,
ठिकाण ते माझे विसाव्याचे

अनवट असो वाट
रानही जरी गर्द घनदाट
साद घालते पाऊलवाट,
डोईवर थवे रान-पाखरांचे

आपली आपण चालावी वाट
पांथस्थाने आसरा मागु नये..
टोचतील काटे, लागेल चकवा
अनाहताची हाक टाळू नये

प्रत्येकाचा वेगळा प्रवाह
प्रत्येकाची वेगळी नदी
प्रवास हा खडतर, केल्यावीण पुरा
प्राप्त कशी होईल माझी गं सरस्वती..

~ संजीवनी


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट