अमर्त्य

अरे देवा, मी असा का पडून आहे जमिनीवर?

आणि एक-एक मिनिट, मी मलाच काय पाहतोय?

आणि हे सगळे असे काय रडतायत माझ्या भोवती बसून??

ओह वेट वेट! मी मेलोय का? लाइक सिरियेसली?

पण मला तर जाणवतय सगळं.. मग मला असा हवेत तरंगत असल्याचा फील का येतोय?

ओह.. आय मीन.. मी खरच मेलोय!!

अँड धिस इज नथिंग बट द आफ्टर लाइफ, दॅट वी ऑल कीप वंडरिंग अबाऊट ऑल अवर लाईव्ज!

अरे पण असं कसं! आत्ता थोड्यावेळापूर्वी मी ज्यूस पीत होतो ना.. आणि ऑफिस मध्ये आज वाडिया सोबत मीटिंग पण होती. यार तो वाडिया परत चिडणार!

शट अप राहुल! अरे मेलायस तू.. तुझी बॉडी खाली पडलिये आणि तू त्या वाडियाचा विचार करतोयस? मी मेलोय खरच! छातीत थोडं दुखत होतं ज्यूस पिताना.. मग ग्लास खाली पडला.. मग विजू धावत आली.. मग मी खाली कोसळलो.. भयानक दुखत होतं.. द पेन दॅट नो वन कुड बिअर.. विजू काय झालं, काय झालं विचारत होती.. मला बोलता येत नव्हतं.. खाली पडल्यामुळे मला फॅनवर जमा झालेली धूळ दिसली, स्वच्छ केला पाहिजे.. पण पुन्हा छातीत भयंकर दुखलं.. विजू डॉक्टर डॉक्टर म्हणत फोन कडे पळाली बहुतेक.. ती दुरून येत असलेली दिसली, फोनवर बोलत.. आणि मग माझे डोळे जड झाले.. बहुतेक मिटले.. बास? दॅट्स इट?? इतका इझिली मेलो मी?? हार्ट अटॅक??

ओह यार.. असा मरेन असं कधीचं वाटलं नव्हतं! नेक्स्ट वीकएंडला गोव्याला जाणार होतो.. विजू आज त्यासाठी शॉपिंग करणार होती.. किती प्लॅन्स होते तिचे.. नव्व्या तर कित्ती खुश होती.. स्कूल मध्ये सगळ्या फ्रेंड्सना सांगितलं होतं तिने..

विजू यार किती रडणारेस.. इनफ तुला श्वास घेता येत नाइये.. तिला पाणी आणून द्या रे कोणीतरी.. सकाळपासून माझ्या आणि नव्याच्या तयारीत बिझी होती, आय गेस तिने साधा चहा पण घेतला नाइये! ओह विजू, डियर, प्लीज डोन्ट क्राय..

नव्या? व्हेअर इज नव्या??...

...ओह माय बच्चा.. व्हॉट आर यू डूइंग इन दॅट कोर्नर माय डियर.. ओह यस.. आय यूज्ड तो हाइड देअर व्हाईल प्लेईंग हाइड अँड सीक.. नवू, पिल्लू, मी तिथे नाइये बाळा.. आय अॅम हियर.. लुक अॅट मी.. डोन्ट गेट अफ्रेड डियर.. एव्रिथिंग इज गोना फाईन..

ओह शिट मॅन.. आय विश आय कुड रेव्हाइंड द टाइम.. आय कुड होल्ड विजू अँड नव्व्या टाईटली अगेन.. नो मॅन.. धिस इज सो सडन.. आय वॉज जस्ट 39!!

वेट.. व्हॉट इज दॅट साऊंड.. कोण रडतय इतकं आक्राळ-विक्राळ?

नो.. डोन्ट टेल मी.. राणे आँटी? कम ऑन यार.. यू हेटेड मी ऑल यॉर लाईफ.. यू यूज्ड टु बिच अबाऊट मी एव्हरी नाऊ अँड देन!!

हम्म वाईट वाटत असेल, आता कोणाविषयी गॉसिप करणार ही बाई..!!

ऑफिस मध्ये कळलं असेल नं एव्हाना.. पण कोणी आलेलं दिसत नाहीये. येस, राजेश दिसतोय तिकडे कोपर्‍यात. अडोरबल बॉय! पण बाकीचे? एरवी किती मागे पुढे करायचे माझ्या.. कामं, डेडलाईन्स.. लास्ट मंथ मध्ये अगरवाल गेला.. मी तरी कुठे गेलो होतो.. मीटिंग होती.. नंतर गेलेलो कांडोलन्सेस द्यायला!

वरुण.. त्याची बायको.. अपार्टमेंट मधली लोकं.. नातेवाईक पण येऊ लागलेत एकेक आता..

, हा संदया असा का बसलाय त्या कोचवर.. इट्स डॅम एक्स्पेंसिव.. किती जपायचो मी त्याला! ही इज जस्ट स्टीकिंग हिज बूगर्स ऑन इट.. शेमफुल!  

नलावडे काका.. सच ए रिजिड पर्सन! माझ्याशी रुक्षपणे बोलताना जसे हावभाव असायचे तसेच अत्तापण आहेत! काहीच फरक पडत नसेल का या माणसाला? एकटे राहतात म्हणून किती चौकशी करायचो मी यांची!

अॅम्ब्युलेन्स चा आवाज? ओह दे विल क्रिमेट मी नाऊ.. नचिकेत सगळ्या अरेंजमेंट्स पाहतोय. लो दिसतोय बराच. कालच विडिओ कॉल झाला होता आमचा.. सगळ्या आठवणी निघाल्या कॉलेजच्या.. गेट टुगेदर अरेंज करत होता तो.. पण मी नेहमी प्रमाणे आढे-वेढे घेत होतो.. बिझी आहे असं दाखवत होतो.. तिथे मानसी येणार.. मग आमचं फेस-ऑफ होणार.. मग पुन्हा जुन्या उजळण्या.. चुकलो की बरोबर केलं याची गणितं मेंदू मांडत राहणार.. मग प्रचंड मनस्ताप.. हे टाळण्यासाठी नं गेलेलच उत्तम!

आणि आता? आता कधीच जाऊ शकणार नाही.. मानसी? तिला समजलं असेल? काय वाटत असेल तिला? रडेल का? पण विजुइतकं मोकळेपणाने तिला रडता नाही येणार!

सारंच संपलं एका क्षणात!

किती काय करायच बाकी होतं.. किती गोष्टी उद्यावर ढकलल्या होत्या..

विजू आणि नव्व्या कसं निभावतील आता?

विजुचा आवाज? नेऊ नका म्हणतेय.. उचलतायत मला! विजू यार सावर स्वताला.. कित्ती प्रेम करते ही माझ्यावर.. तिला मी कधी सांगूच शकलो नाही ती माझ्यासाठी कित्ती महत्वाची आहे ते.. काल रात्री माझ्या डोक्याला मालीश करत होती तेव्हा सांगायला हवं होतं का.. पण मी माझ्याच फुशारक्या मारत राहिलो..

आणि आता काय उरलय?  मार्कशीट्स.. अचिएव्हमेंट्स.. प्रोमोशन्स.. स्टेटस.. एव्हेरीथिंग इज जस्ट इल्युजनरी!

राम नाम सत्य है.. राम नाम सत्य है..

आज मी खर्‍या अर्थाने घराबाहेर पडलोय.. धिस हाऊस.. आय वर्क्ड सो हार्ड टु अर्न धिस! अँड आय अॅम लीविंग इट टूडे.. फॉर एवर..

मेलोय मी खरच! आणि मागे उरलीये ती फक्त प्रतिमा.. माझ्या संपर्कातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात मी तयार केलेली माझी प्रतिमा.. माझ्या असण्याचे छोटे-छोटे तुकडे.. शिल्लक राहतं ते इतकच..

आय विश आय कुड हॅव वर्क्ड ए बिट हार्डर टु मेक दीज पीसेस मोर लाइवली, एंपथेटिक अँड ब्यूटीफूल.. आय जस्ट विश..

राम नाम सत्य है..!!

 

-      - संजीवनी 

 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Chan ahe
अनामित म्हणाले…
Bharich ki
अनामित म्हणाले…
Vinodi post wachaila awadtil this is nice one..

लोकप्रिय पोस्ट