श्रीहरी
मनातल्या मनात,
डोळ्यांतल्या तळ्यात
तळ्यातली फुले,
विठोबाच्या गळ्यात
कुणी म्हणे सुकलेली,
कुणी सुगंध नसलेली
विठूरायाने ल्याली जरी,
नव्हतीचं तशी फुललेली
माझ्या फुलांची ती माळ,
लपेटून तिन्ही त्रिकाळ
विठू म्हणाला बाळे,
नको जाऊस कोमेजून
रत्नांची अभिषेकांची,
मला नाही गं ओढ
माझ्या लेकरांच्या स्मिताने,
मी सुखावतो आतून
तुझ्या तळ्यातली फुलं,
भावली मला खरोखर
माझ्यातल्या पाषाणां,
स्पर्श मायेचा सुकोमल
मी असा ऊभा विटेवरी, अविचल ठायी ठायी
तुम्हा लेकरांच्या डोळ्यांत, परि जागतो श्रीहरी..
तुम्हा लेकरांच्या डोळ्यांत, परि जागतो श्रीहरी!!
टिप्पण्या