चंद्र

कधी रे उगवावा तो चंद्र

सांज रेंगाळते किनारी

दाटलेला अंधार, खुणावतो परोपरी


तुला शब्द सुचत नाहीत

गाठ माझी सुटत नाही

चाचपडणं नित्याचं, जिवाची लाही-लाही


भिती तुला भविष्याची

मला निसटणाऱ्या क्षणांची

दोन्हीमध्ये कातर कातर, रात्र सरते अावसेची


उद्याचा सूर्य असेल निराळा

ओढ मला आजच्या चंद्राची

तुझ्या नेत्रीं, वेगळीचं छवी, आज-उद्या पल्याडची


कळते तुझी सारी हुर-हुर

उद्याची भिती अन् काहूर

हेचं तर लक्षण जिवंतपणाचं, बाकी सारं क्षणभंगूर


बघ पाऊस खिडकीशी अन्

कविता माझ्या ओठांशी

वेळ अशी नाजुक,जाईल विरुन डायरीच्या तळाशी

 

~ संजीवनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट