दिगंत : भाग १६ (अंतिम भाग)
“This trip was best of all..”
घाटावर
परतताना अनुराग म्हणाला.
“हम्म.. ” रियाने हसून सहमती दर्शवली.
बोलत बोलत दोघे गाडीपाशी येऊन पोचले.
“so.. मग कधी परतताय तुम्ही दोघी?” अनुराग ने विचारलं.
“बघू आमचं ठरलं नाहीये अजून. एक-दोन दिवसात मे बी..” रिया म्हणाली.
“हम्पी टु पुणे.. लॉन्ग डिस्टन्स इट इज..”
“हो.. पण मजा येते अशा रोड ट्रिप्स मध्ये.. ट्रॅवल इज द बेस्ट
थेरपी. स्वानुभवातून पटलंय मला आता हे.” रिया उत्साहाने म्हणाली.
“येस.. इंडीड इट इज..” तिच्याकडे पाहत तो म्हणाला.
“ऐक नं..” रिया जराशी घुटमळली.
“बोल नं.” अनुराग.
“आपण हे सगळं घरी सांगण्याची घाई नको करायला.. असं मला वाटतंय.”
तिच्याकडे पाहत जरासा विचार करून अनुराग म्हणाला,
“ते लगेच एंगेजमेंट आणि लग्नाच्या मागे लागतील म्हणून?”
तिच्या मनातलं त्याने बरोबर ओळखलं होतं. रियाने हसून त्याच्याकडे
पाहिलं.
“हो.. म्हणजे मला असं वाटतंय की we should know each other more.. आणि दोन-एक महिन्यात माझी नेक्स्ट prelims exam पण आहे. I need to focus on that now..”
“yes yes.. off
course.. Take your time.” अनुराग शांतपणे म्हणाला.
रियाने हसून त्याच्याकडे पाहिलं.
आणि मग ती पुण्यात परतल्यावर भेटायचं
ठरवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
वार्यावर अल्लद तरंगणारं हलकं हलकं मन घेऊन
रिया हॉटेलवर परतली.
तिला पाहताच संहिता मिष्किलपणे मोठ-मोठयाने गुणगुणू लागली.
“..आजकल पांव जमींपर नही पडते मेरे.. बोलो
देखा है कभी तुमने मुझे उडते हुये..?..”
रिया त्यावर हसत, जाऊन बेडवर आडवी पडली.
“काय काय झालं? सगळं सांग
मला.. विथ एव्री डीटेल..” संहिता प्रचंड उत्सुकतेने म्हणाली.
तिच्याकडे पाहत हाताची उशी करून रिया
म्हणाली,
“हम्म.. सांगते. पण आधी तू सांग. तुझ्या
आणि अनिकेत मध्ये काय सीन चालूये नक्की. काल त्याचा फोन येऊन गेल्यापासून पाहतेय, नुसती
गुलाबी गुलाबी दिसतेयस.”
त्यावर गालातल्या गालात हसत संहिता खाली
बसली.
“काय सांगू रिया.. सगळी उत्तरं अगदी
तिथेच होती बघ. मी उगाच स्वत:च क्रिएट केलेल्या अंधारात चाचपडत होते. मला माझ्या
प्रॉब्लेम्सच्या पलिकडचं काही दिसत नव्हतं. त्या सगळ्या पासून थोडं दूर आल्यावर, त्रयस्थपणे
सार्याकडे पाहिल्यावर सगळं लख्ख दिसायला लागलंय आता.”
पुन्हा आडवी होत रिया बोलायला लागली,
“exactly यार.. आपण
उगाच अवघड करून ठेवतो सगळ्या गोष्टी. आपल्या समजूतींचं क्लाऊड तयार करून जगतो आपण आपल्याभोवती.
तेच तेवढंच खरंय असं वाटायला लागतं काही काळाने. आपलं जग संकुचित आणि दिशा रुंद
व्हायला लागतात. आणि मग त्या आपल्या बबल च्या पलिकडचं अनंत शक्यतांनी भरलेलं अवकाश
दिसेनासं होत जातं.. दिशा संपल्या सारख्या, क्षितिज
हरवल्या सारखं वाटायला लागतं.
पण, मुळात तसं
नसतंच काही. गरज असते ती केवळ आपण आपल्या कोशातून बाहेर येण्याची.. मग सगळं लख्ख
होत जातं. क्षितिज विस्तारतं. दिगंत खुणावतो..”
“हम्म.. खरं आहे.” संहिताने होकार भरला.
आणि मग पुन्हा रियाकडे पाहत म्हणाली,
“बाय द वे.. संत अनुराग चे मौलिक विचार
आहेत का हे?”
“हाहा.. नाही. संत अनुरागचा मौलिक ‘इफेक्ट’ आहे हा..”
डोळे मिचकावत रिया उत्तरली.
“म्हणजे तू? म्हणजे
तुम्ही..??” संहिता excite झाली.
तिच्याकडे पाहत रियाने मान हलवली आणि
म्हणाली,
“हो.. now you are free to
tell this ‘Hampi story’ to our future kids..”
“what? खरंच?.. I told
you. I told you.. छुपी रुस्तूम आहेस तू. This is grand yar.. more than
happy for you both..” संहिता आनंदाने म्हणाली.
“and I’m happy for
you Sanhita..” रिया संहिता कडे पाहत म्हणाली.
दोघींनी मग एकमेकांच्या डोळ्यांतला तो नव्याने
गवसलेला अनोखा आनंद हिप्पी आयलंड वर स्कूटीची सफर करून celebrate केला. दोघी भरपूर
भटकल्या.. रस्ता चुकल्या.. थकल्या.. हरवल्या.. निसर्गाच्या कुशीत जाऊन स्वत:चीच पुन्हा
नव्याने गळाभेट घेऊन परतल्या..
दोघींना आता ‘घर’ बोलावत होतं.
मनाला हवी ती विश्रांती मिळाली होती. ताजेतवाने उन्मेष मनात घेऊन, आयुष्याला भिडण्यासाठी
दोघी आता उत्सुक होत्या.
ठरल्याप्रमाणे मग दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी
हम्पीचा भरल्या मनाने निरोप घेतला आणि परतीचा प्रवास सुरू केला.. नवे अनुभव आणि विस्तारलेलं
क्षितिज सोबत घेऊन खुणावणार्या दिगंताच्या दिशेने..
विराम
@संजीवनी देशपांडे
(कथा पुर्णपणे काल्पनिक असून कथेतील ठिकाणं
मात्र खरी आहेत.
मी हम्पी प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. सगळी
वर्णने गोळा केलेल्या माहितीवर विसंबलेली आहेत. त्यामुळे, मला शक्य तितकी
अचूकता राखण्याचा मी प्रयत्न केलेला असला तरी काही तपशील मागे-पुढे होण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
रिया आणि संहिता या दोन मैत्रीणिंची ही गोष्ट कथामालिकेच्या स्वरुपात लिहली आहे. ती सुरू करताना लिखाणातही ‘सीझन’ पॅटर्न आणण्याचा विचार होता. त्या विचारा नुसार हा या कथेचा पहिला सीझन आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचा लवकरच लिहेन.
सर्व छायाचित्रे जालावरुन साभार.)
टिप्पण्या
waiting for next season
खूप धन्यवाद 😊
सुंदर