'पर्यावरण दिवस' आणि शुभेच्छा वगैरे..

विश्वाच्या, मानवाला ज्ञात असलेल्या दोन ट्रिलियन आकाशगंगांच्या पसार्‍यातील, ‘ मिल्की वेगॅलक्सि मधल्या जवळपास 200 बिलियन ज्ञात सूर्यमालांपैकी एका सूर्यमालेतील, एकापृथ्वीनावाच्या ग्रहावर (अशा 1.3 मिलियन पृथ्वी आपल्या एका सूर्यामध्ये फिट बसतील) बसून मी, जी या पृथ्वीवरच्या 8.7 मिलियन स्पीसीज पैकी एक असलेल्या होमो सेपियन प्रजातीमध्ये मोडते, ज्या प्रजातीनेशेतीचा शोधलागल्यापासून अख्खी पृथ्वी तिच्या पर्यावरणासकट हायजॅक करुन, इतर कितीतरी मिलियन प्रजातींना आपल्या पायांशी लोळवून, पृथ्वी म्हणजे आपल्या तीर्थरूपांची जागिर असल्याप्रमाणे वागून, ‘आपण तेवढे प्रगतअसा शेरा मिरवत आपणच बिघडवलेल्या पर्यावरणाचा कैवार घेतपर्यावरण दिवसम्हणून जाहीर केलेल्या आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देते !! 


थोडक्यात काय तर आपण विश्वाच्या पसाऱ्यातले किडा-मुंगीही नाही. आणि तसं असूनहीआपल्यानसलेल्या काही फुटांसाठी अख्खा जन्म खर्च करत नवनव्या सोयींच्या मागे लागत रोज ज्या पर्यावरणाच्या चिंध्या करतो त्या पर्यावरणाचा आज पोळा आहे आणि त्याच्या या शुभेच्छा

उद्यापासून पुन्हा आपण पर्यावरणाच्या गप्पा मारतप्लास्टिकआयुष्य जगायला आणि आपला कार्बन फूटप्रिंट वाढवायला मोकळे.. :)

 


संजीवनी 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट