इज़हार.. (संपी : भाग - ३६)मस्त रोमॅंटिक वातावरणात दोघेही जवळपास भिजून सिंहगडावर पोचले. चोहीकडे हिरवळ, हाताशी येतील असे वाटणारे ढग आणि एकमेकांची साथ.. मंदार आणि संपी आज ढगातच होते.

भारी वाटतंय ना?’ गडावरचं धुंद वातावरण पाहून मंदार संपीला म्हणाला.

हो.. मस्तय! मी पहिल्यांदाच आलेय इथे..

थोडं अंतर चालून गेल्यावर, मंदार संपीकडे पाहून म्हणाला,

लास्ट वीक ग्रुप सोबत आलो होतो इथे.. तेव्हाच ठरवलं होतं, एकदा तुला घेऊन यायचं..

संपी जराशी हसली.

दोघेही मक्याचं कणीस खात एका दगडावर टेकले. पाऊस ओसरला होता. हलकंसं उन्हही मधून मधून डोकावत होतं.

मग अभ्यास काय म्हणतोय?’ मंदारने विचारलं.

चालूये.. कणीस खात संपी म्हणाली.

नक्की ना.. नाहीतर बसशील पुन्हा dan brown नाईतर कोण ती तुझी सध्याची फेव्हरीट.. हं, गौरी देशपांडे.. घेऊन!

कणीस बाजूला ठेवत संपी म्हणाली,

हाहा.. नाही, करतेय मी अभ्यास. उरलेल्या वेळात वाचते अधून-मधून. वेळ मिळाला तर. पण, bdw तुला काय एवढं वावडं आहे रे त्यांचं?’

मला? हाहा नाही तसं काही नाही..

मग कसंय?’

वेल, फॉर यॉर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या कॉलेजमधल्या मुली माझं एटेन्शन मिळावं म्हणून काय-काय करतात. आणि तू बसतेस त्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून..

मग देत जा की त्यांनाच एटेन्शन..

हो का? देऊ का खरंच?’

दे की.. मला काय विचारतोयस

संपदा, तू कधी सीरियस होणारेस गं?’

सीरियस म्हणजे?’

म्हणजे सीरियस.. अबाऊट एव्रिथिंग.. अबाऊट लाइफ..

सी मंदार, आयम सीरियस अबाऊट माय लाइफ. आता मला तीनच गोष्टी दिसतायत.. इंजीनीरिंग आणि त्यानंतर चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट.. अँड आयम वर्किंग फॉर दॅट नाऊ..

या दोनच झाल्या.. तिसरी कुठली?’

त्या समोरच्या स्टॉलवरची पिठलं-भाकरी.. जाम भूक लागलीये. या तुझ्या स्वीट कॉर्नने काहीच झालं नाही.. हाहा..

ओह गॉड.. संपदा, यू आर impossible!!’

आय नो.. म्हणत संपी पिठलं-भाकरी घ्यायला गेली सुद्धा.

दोघांसाठी दोन प्लेट्स घेऊन ती परत आली.

स्वत:ची प्लेट हातात घेत मंदार म्हणाला,

अँड व्हॉट अबाऊट अस?’

अम्म?’ संपीचा घास तोंडातच अडकला, व्हॉट... अबाऊट अस?’    

मी तुला विचारतोय!

मी काय सांगू.. तूच म्हणाला होतास की मी तुला आवडते..’

हो..

आवडते म्हणजे नक्की काय..

आवडतेस म्हणजे आवडतेस.. खूप आवडतेस. तुझ्यासोबत असलं की छान वाटतं.. तू कायम सोबत असावस असं वाटतं.. तुझं ते श्री आणि मयूर सोबत बोलणं सोडलं तर बाकी सगळंच आवडतं..

हाहा.. पण मी बोलणं सोडणार नाहीचे त्यांच्यासोबत..

यस.. आय नो दॅट अनफॉर्चुनेटली! आणि मी पण नाहीच सोडणार मैत्रेयीसोबत बोलणं..

संपीने चमकून त्याच्याकडे पाहिलं,

नको सोडूस.. मला काही फरक नाही पडत.

असं का?? बर... हसू दाबत तो म्हणाला.

हसू नकोस तू.. खरंच मला काही फरक पडत नाही.

हाहा.. असुदे. तिचं साधं नाव जारी घेतलं तरी चेहर्‍यावर बारा वाजलेले असतात आपल्या..

....

दोघेही जरावेळ शांत झाले. हातातलं पिठलं-भाकरी पण संपलं होतं. संपीने sack मधून पाण्याची बाटली काढली. हात धुवून पाणी प्यायली. आणि बाटली मंदारला दिली.

दिवस कलला होता. गार वारा सुटलेला.

सुरुवात कोणी करायची या प्रश्नापाशी अडलेले दोघे काहीवेळ नुसतेच अवघडुन बसून राहिले.

काही वेळाने न राहवून मग संपीच म्हणाली,

ओके. बास आता. उठ आणि छान प्रपोज कर मला..

काय?’ तो दचकून म्हणाला.

हो.. बस गुढग्यावर.. आणि विचार..

हाहा.. काहीही.. आर यू सीरियस?’

हो.. damn serious.. माझी फॅंटसी आहे, जो असं गुढग्यावर बसून विचारेल त्यालाच मी हो म्हणेन..

काय?? संपदा.. तू अ श क्य आहेस! मंदार हसत म्हणाला.

माहितीये मला.. उठ..

मंदारने क्षणभर विचार केला आणि मग तो खरंच उठला. शेजारच्या कुठल्याशा वेलीवर उगवलेलं कुठलंसं फूल हातात घेतलं आणि संपीसमोर गुढग्यावर बसत, तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला,

संपदा, तू ठार वेडी आहेस हे मला माहितीये. But still I’m in love with that madness.. in love with ‘YOU’..’

नाही म्हटलं तरी आजूबाजूच्या चार चेहर्‍यांनी वळून बघितलंच.

संपी अवाक झाली होती. तो खरंच असं काही करेल, तिला वाटलं नव्हतं.

ती जागची उठली.

आणि ते फूल हातात घेत म्हणाली,

बरा बोलतोस तसा कधी-कधी..

उभा राहत मंदार म्हणाला,

बास? मला गुडघ्यावर बसायला लावलंस. तू एकदा नुसतं तरी म्हण.. उत्तर दे.. you do or not?’

संपीने एकदा हातातल्या फुलाकडे पाहिलं, एकदा त्याच्याकडे आणि मग काहीच न म्हणता मान वळवून गालातल्या गालात हसली फक्त..

ओह माय गॉड.. लाजलीस तू चक्क?? बघू इकडे..

चेहरा सावरत मग संपी त्याला म्हणाली,

गप्प बस.. चल आता उशीर झालाय.. अभ्यास आहे मला.

आणि चालता चालता तिने हळूच तिचा हात त्याच्या हातात गुंफला..

 

मंदारने सुखावून तिच्याकडे पाहिलं. तिने त्या एका स्पर्शातून त्याला काय-काय सांगून टाकलं होतं..!

 

 

 

क्रमश:


संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Loving this series 😍😍😍 and of course, your style.
Suharsha म्हणाले…
OMG...
Just amazing 👏
Tanuja म्हणाले…
Amazing zalay ha pan bhaag!
मन कस्तुरी रे.. म्हणाले…
khup chan
te chitra badalata nahi ka yenar pratyek bhagasobat!


:-)
अनामित म्हणाले…
Khup chhàn
अनामित म्हणाले…
Man kasturi re.. agreed
अनामित म्हणाले…
Pudhil bhag?
सर्वांचे खूप आभार :)
मन कस्तुरी रे, अनामित.. नेक्स्ट टाइम प्रयत्न करेन

लोकप्रिय पोस्ट