दिगंत २.३ : समोरासमोर!योगा टु reduce हर madness!’

आतून बाहेर येत संहिता म्हणाली. मी तिच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. मग ती हसली.

ओहह.. तो हिला करावा लागेल की इतरांना?’

खत्रुडासारखा अनुराग बोललाच. मी तोंड उघडलंच होतं उत्तर द्यायला पण मग जाऊदे म्हणत गप्प बसले. मग अनुराग आणि संहिताचे किती दिवसांनी भेटलो’, ‘hows life’ वगैरे बिनाकामाचे संवाद बराच काळ चालू. मग संहिताने नव्या जॉबविषयीची टेप सुरू केली. मग त्याने त्याच्या नव्या प्रोजेक्टची. मग मला कानकोंडं व्हायला लागलं. यांच्याकडे एवढे विषय कसे काय असतात. काय बोलायचं हा प्रश्न यांना पडतच नाही का? दोघांचं फील्ड बर्‍यापैकी सारखं आहे म्हणा. तरीपण इतकं बोलायचं? मला तर काय मग अजून’, बाकी मजेत?’, किंवा फॉर ए चेंज, पाऊस भलताच पडतोय नाही यावर्षी! यापलीकडे फारसं काही सुचतच नाही. आणि जे सुचतं, उदाहरणार्थ, क्लायमेट चेंज, इंटरनॅशनल रीलेशन्स, किंवा ancient civilizations, plate tectonics.. etc etc.. ते कोणालाही ऐकायचं नसतं. हे असे विषय जगात आहेत?’ टाइप्स लुक मिळतात. जॉब, मनी, parties, vacations, promotions, luxuries वगैरे सोडून इतर कशात काही राम आहे असं आजकाल कोणाला वाटतच नाही का! मी बोलू लागले की मग ओ सुधारक, पुरे! असे शेरे मिळतात. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास वगैरे विषय केवळ जुन्या कॉलेजेसच्या लायब्रर्‍यांमध्ये धूळ खात पडण्यापुरते उरलेत की काय अशी शंका यावी असं वातावरण चोहीकडे. यूपीएससीच्या ग्रुपमध्ये गेल्यावर जरासं हुश्श होतं. पण तिथेही जास्तकरून या विषयाचं हे-हे असं-असं केलं की एवढे मार्क फिक्स टाइप्स चर्चा आता वाढायला लागल्यात. मूळ अभ्यास, आकलन या गोष्टींना इतकं गृहीत का धरतो आपण? असं मी म्हटलं तर मॅडम, जमिनीवर या. पास व्हायचं असेल तर तुम्हीही हेच करा. नाहीतर यावर्षीही जाईल पोस्ट थोडक्यात.. अरे म्हणजे? इतका राग आला होता त्या प्रवीणचा त्यादिवशी. पण तेव्हाही काही न बोलता गप्प बसले. हे अजून एक, जेव्हा बोलायचं असतं तेव्हा नेमकं उत्तर का येत नाही माझ्या तोंडात? नंतर कधी जेवताना, कधी मध्यरात्री झोपेत असताना किंवा अजून अशाच फालतू वेळी वाक्यच्या वाक्य तोंडात येतात. वाटतं जाऊन फेकावी त्यांच्या तोंडावर. पण काय उपयोग. वेळ गेलेली असते.

हे बघ ही हरवली पुन्हा..

संहिताचं वाक्य ऐकून मी वर पाहिलं. दोघेही माझ्याकडे पाहत होते.

काही हरवले वगैरे नाही. तुमचं चालू होतं म्हणून बसले होते ऐकत..

आता काय म्हणणार दुसरं.

बरं तुमचं चालूद्या. मी निघते. मीटिंग आहे

संहिता गेली. आता आमचं काय चालणारे काय माहित.

काय झालंय कळेल?’

आला अपेक्षित प्रश्न.

कुठे काय?’ मी मोकळे केस वर टाय अप करत म्हटलं.

पेपर कसे गेले?’

माहित नाही

म्हणजे इंटरव्ह्यु चे chances आहेत की नाही?’

माहित नाही

तू नीट बोलणारच नाहीयेस का?’

तू काय प्रश्न विचारतोयस ते बघ आधी. एक्झॅमचं फॉरमॅट माहितीये न तुला. रिजल्ट लागेपर्यंत खात्री नसते कशाचीच. काय सांगू मी..

अगं तसं नाही. पण काहीतरी अंदाज आलाच असेल नं..

नो अंदाज. रोज जावून बोटं दुखेपर्यंत खरडुन येत होते फक्त. इतके प्रश्न. त्यांची शब्दमर्यादेत अचूक उत्तरं. पेपर संपल्यावर आठवत पण नाही कशाचं उत्तर नक्की काय लिहलं.

बरं ठिके सोड. दुसरं काहीतरी बोलू.

दॅट्स बेटर..

त्याने इकडे-तिकडे पाहिलं. मला क्षणभर त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं. इतके दिवस हा माझी वाट पाहत थांबलाय. जवळपास तीन महिन्यांनी भेटतोय आज. किती अपेक्षा ठेऊन आला असणार हा. आणि मी ही अशी mad वागतेय. तो त्याने आणलेले मोमोज बाहेर काढत होता.

प्लेट्स कुठेयत?’

कशाला प्लेट्स?’

त्याने एक लुक देऊन माझ्याकडे पाहिलं. त्या मोमोज च्या पॅक कडे पाहून मी म्हटलं,

कशाला हव्यात प्लेट्स. खाऊ तसेच.. नंतर त्या विसळायला लागतील

यावर तो प्रचंड हसला.

तू नेहमीच अशी आळशी वागतेस की सध्याचा ट्रेंड आहे?’ असं म्हणत उठून किचन मध्ये गेला. बरंचसं खालीवर करून प्लेट्स घेऊन बाहेर आला. तोवर न राहवून मी एक मोमो खाऊन पण टाकला होता. त्याच्या हातातल्या प्लेट्स कडे मी पहायला लागल्यावर त्यात मोमोज सर्व करत तो म्हणाला,

डोन्ट वरी. मी ठेवेनं धुवून.

यावर मलाच जरासं लाजल्यासारखं झालं. पण मी तसं दाखवलं नाही. मोमोज मस्त होते. मी त्यावरच कॉन्संट्रेट केलं.

मग आता पुढे?’

पुढे काय. तुला हवाच असला तर चहा करते..

मी आपल्याविषयी बोलतोय. आपलं पुढे काय?’

त्याचा सीरियस चेहरा पाहून मला हातातला अर्धा मोमो खाता येईना. आता बोलणं भाग होतं.

पुढे काय.. आता निकाल. मग कळेल पास की फेल ते.

घरी न सांगता आता मी राहू शकत नाही. आई रोज मुली पहा म्हणून मागे लागलीये. दरवेळी काय कारण सांगू तिला?’

पहा मग मुली! मी अर्धा मोमो खाऊनच टाकला.

आर यू सीरियस?’

मी खाता-खाता वर पाहिलं,

हे बघ अनुराग, मी म्हटलंच होतं. हे वाटतंय तितकं सोपं नाहीये. पण तू ऐकलं नाहीस. माझं हे असंच आहे सगळं अधांतरी. तू उगाच तुझी फरफट नको करून घेऊस. अजूनही वेळ गेलेली नाही. घरी सांगितलेलं नाहीये अजून आपण. तू विचार कर..

तो क्षणभर माझ्याकडे पाहतच राहिला.

तुला माझ्याशी लग्न कारायचंय नं रिया?’

आता मी गडबडले.

अरे म्हणजे तसं नाही..

मग कसंय?’

आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो.

इतक्यात दाराची बेल वाजली. मला वाटलं बरंच झालं. मी चटकन उठून दार उघडायला गेले. पण दार उघडल्यावर वाटलं, नो वे!!

दारात आई-बाबा उभे होते..

तुला घरी यायचं नाहीये. म्हटलं आपणच जाऊन यावं म्हणून आलो

असं काहीतरी म्हणत दोघे माझ्या समोरून आत आलेसुद्धा..

 

क्रमश:


संजीवनी देशपांडे  

 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
मस्त चाललाय सिझन 2
अनामित म्हणाले…
What a twist
अनामित म्हणाले…
Pudhil bhag??
अनामित म्हणाले…
छानच:)
Sanjeevani म्हणाले…
सर्वांचे आभार :)

लोकप्रिय पोस्ट