पाळी की पर्वणी ?

 


श्श्शु.. हळू बोल ना..’, चार दिवस शापाचे..’, इथे शिऊ नको.. तिथे जाऊ नको.. किती डेंजर पेन होतात माहितीये?’…

मासिक पाळी म्हटलं की बहुतांश बायकांच्या मनात पहिल्यांदा काय येतं तर हे.. शी नको ते चार दिवस.. बायकांच्याच मागे का हे असं सगळं?’. त्यात घरी कमी-जास्त प्रमाणात लादले जाणारे निर्बंध, नियम.. या सगळ्याचा मानसिक पातळीवर महिलांच्या मनावर काय परिणाम होतो तर पाळी म्हणजे काहीतरी खूप वाईट गोष्ट आहे, स्त्री त्यादिवसात अपवित्र असते वगैरे. विटाळ हा अजून एक अतिशय वाईट शब्द यासाठी वापरला जातो.

या दिवसात बहुतांश ठिकाणी बायकांना मिळणारी हिणकस वागणूक, ती अगदी हातही लाऊ नये इतकी अपवित्र गोष्ट आहे असा समज, तिने अमुक-अमुक करायचं नाही.. वगैरे गोष्टींमुळे पाळी विषयीच्या रुढींसंदर्भात एकप्रकारचा राग माझ्या मनात खूप आधीपासूनच होता. त्यामुळे ते निर्बंध मी कधीच मनापासून मान्य केले नाहीत आणि अवलंबलेही नाहीत. याविषयी मी माझ्या आईपासून अजून बर्‍याच जणींशी  कायम वाद घालत आले आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक रूढीसमोर माझा का?’ हा प्रश्न कायम उभा असायचा. आणि त्याचं समाधानकारक उत्तर कोणीही देऊ शकायचं नाही. चांगलं नसतं’, पाप आहे.. देवाचा कोप होईल वगैरे स्पष्टीकरनं तर मला त्यापासुन अजूनच दूर न्यायची. केवळ चालत आलंय.. म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि ती फॉलो करणं हा माझा पिंड नाही. मला प्रश्न पडतात आणि त्यांची समाधानकारक उत्तरंही हवी असतात.

पाळीविषयीचे निर्बंध पाळण्यामागची तार्किक उत्तरं मला कोणाकडूनही मिळाली नाहीत. काही जण blindly ते सगळं फॉलो करत होते, काही जण छे! थोतांड आहे सगळं म्हणत गोष्टी उडवून लावत होते. मी दुसर्‍या प्रकाराकडे कल असणारी. पण, एका पॉइंट नंतर फॉलो का करायचं नाही?’ यासंबंधी ठोस मुद्दे शोधून काढण्याची निकड वाटू लागली. इतिहासाची आवड असल्याने प्राचीन संस्कृतींमध्ये मासिक धर्माविषयी काय प्रथा होत्या, त्या का होत्या हे शोधण्याचे मग मी प्रयत्न सुरू केले. पण खरंतर, त्यामागचा खरा हेतू हे सगळे निर्बंध कसे निरर्थक आहेत या माझ्या मताला पुष्टी देणारे संदर्भ आणि पुरावे शोधण हाच होता. मी आंतरजालावर सर्च केलं. ढीगभर articles वाचली. पण सगळी वरच्याच दोन प्रकारात मोडणारी. समाधान काही केल्या होत नव्हतं.

काही दिवसांनी याच शोधात एक आर्टिकल वाचण्यात आलं, सिनू जोसेफ यांचं. आणि खरं सांगते त्या एका आर्टिकलने माझे विचार 180 डिग्री मध्ये चेंज व्हायला सुरुवात झाली. मी प्रथा फॉलो का करायच्या  नाहीत या प्रश्नाच्या उत्तरार्थ खरतर तिथवर पोचले होते पण उलट फॉलो का करायच्या या प्रश्नाच्या उत्तरांनी मला येऊन गाठलं होतं! त्या आर्टिकलने माझी या सगळ्या विषयाकडे आणि एकूणच ‘menstruation’ कडे पाहण्याची दृष्टीच पालटून टाकली. नंतर तर मी इतकी पछाडून गेले की लेखिकेचं या विषयावरचं ‘Rtu Vidya’ नावाचं पुस्तक ऑर्डर करून अधाशासारखं वाचूनही काढलं. आणि अक्षरश: थक्क झाले. त्याआधी जर मला कोणी या सगळ्या प्रथांमागे विज्ञान आहे असं सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. नको त्या प्रथांना विज्ञानाचं कोंदण देऊन तुम्ही त्यांचं विनाकारण उदात्तीकरण करत आहात असंही म्हटलं असतं.

पुस्तकाची सुरुवात एका quote ने होते आणि इथूनच त्याचं वेगळेपण सुरू होतं.

श्री अमृतानंदा नाथ सरस्वती, आंध्रप्रदेशातील देवीपुरम चे संस्थापक, ज्यांना सगळे गुरुजी म्हणून ओळखायचे त्यांचं हे quotation स्त्री अपवित्र असते या रूढ विचारांना छेद देणारं आहे, ते म्हणतात,

“What is pure, we don’t touch. And what we don’t touch, we call it a taboo. She (a menstruating woman) was so pure, that she was worshipped as a Goddess. The reason for not having a woman go into a temple is precisely this. She is a living Goddess at that time. The energy of the God or Goddess which is there in the murti will move over to her, and that murti becomes lifeless, while this (the menstruating woman) is life. So that’s why they were prevented from entering the temple. So it is exactly the opposite of what we think”.

पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हा क्षणभर, काही नाही हे म्हणजे देवत्व देऊन प्रथा लादण्याचा एक प्रकार आहे फक्त असा विचार मनात येऊन गेला. पण जस-जसं पुस्तक वाचत गेले तसे-तसे विचार बदलत गेले. काही खूप नव्या गोष्टी समजल्या.

त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे menstruation आणि त्या दरम्यान स्त्री च्या शरीरात एरवी पेक्षा जास्त प्रमाणात तयार होणारे फ्री radicles. Free radicles पेशींसाठी मारक असतात आणि त्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता असते. या free radicles चं प्रमाण प्रमाणाबाहेर गेलं की शरीराला ‘oxidative stress’ जाणवायला लागतो. जे primary dysmenorrhea (period pain) मागचं कारण समजलं जातं. Free radicles म्हणजे अस्थिर अणू ज्याच्या बाह्य कक्षेमध्ये पुरेसे इलेक्ट्रॉन नाहीत. ही electrons ची कमतरता भरून काढण्यासाठी मग तो अणू आजूबाजूच्या अणूंशी बंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच त्या दुसर्‍या अणूच्या बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉन वापरतो. या free radicles वर पॉजिटिव चार्ज असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे free radicles असतात. पण biologically सर्वात धोकादायक असतो तो ऑक्सिजन च्या अणूपासून तयार झालेला. त्याला Reactive Oxygen Species (ROS) म्हणतात.

मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरात या टॉक्सिक ऑक्सिजन radicles चं प्रमाण वाढतं आणि त्या तुलनेत antioxidants चं प्रमाण मात्र कमी होतं. एरवी ईस्ट्रोजन नावाचं हार्मोन ROS वर कंट्रोल ठेवायचं काम करत असतं पण पाळी दरम्यान या हार्मोनचं प्रमाण शरीरात ऑल टाइम लो वर असतं. या सर्वांमुळे त्या काळात शरीराला बाहेरून योग्य antioxidants चा पुरवठा झाला नाही तर शरीर excess oxidative stress मध्ये फेकलं जातं. ज्यामुळे पीरियड पेन तर होतातच पण प्रसंगी infertility किंवा डेलीवेरी related प्रॉब्लेम्सही उद्भवतात.

दाक्षिणात्य राज्यांमध्ये मुलीला नहाण आलं की मोठा सोहळा केला जातो. त्यावेळी तिला जे अन्न दिलं जातं त्यात तीळ, गूळ, खोबरं, उडीद डाळ, खिचडी, हळदीचं दूध इ. इ पदार्थ दिले जातात. यातल्या प्रत्येक पदार्थातून शरीराला antioxidants मिळतात.

आता सर्वात महत्वाचा मुद्दा. त्या दिवसात स्त्रीला का शिवायचं नाही?

वर पाहिल्याप्रमाणे या दिवसात स्त्री शरीरावर ROS मुळे पॉजिटिव चार्ज असतो. काही अभ्यासांनुसार हा भार पाळीदरम्यान several thousand microvolts ने वाढतो. तर या भारामुळे ती स्त्री तिला स्पर्शणार्‍या व्यक्तींमधून electrons घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तीच्यावरचा भार neutral होईल. यामुळे थोडक्यात तिच्या कॉनटॅक्ट मध्ये येणार्‍या व्यक्तिला electrons ची कमतरता जाणवू लागते आणि त्याच्या शरीरात oxidative स्ट्रैस निर्माण होण्याची शक्यता असते. आणि यामुळेच मासिक पाळी दरम्यान स्त्रीला शिऊ नये असा संकेत आहे. आणि शिवल्यास लगेच आंघोळ करावी. का? तर water in motion is said to produce negative ions and thus it helps neutralise previous loss of electrons. आणखी एक गम्मत म्हणजे या दिवसात लहान मुलांना लोकरीचे कपडे घालतात. आणि ते घालून ते मूल स्त्रीजवळ गेलं तरी ते चालतं असा समज आहे. हे मीही माझ्या आजूबाजूला पाहिलंय. पण ते चालतं मागचा खरा अर्थ आत्ता समजतोय. लोकर ही विद्युत दुर्वाहक असते. त्यामुळे लहान मुलाच्या शरीरातून ही electronsची होऊ शकणारी देवाण-घेवाण ती रोखून धरते. आणि मुलाला कुठलाही धोका पोचत नाही. यामागे असा काही अर्थ असेल असं खरंच मला कधी वाटलं नव्हतं.

पिढ्या न पिढ्या आपण निव्वळ रूढी पुढे नेतोय. त्यामागचा अर्थ कधीच हरवून बसलोय. या गोष्टींमागचं हे विज्ञान थक्क करणारं आहे. या रूढी निरर्थक आहेत म्हणत त्या उडवून लावणं जितकं वेडेपणाचं आहे तितकंच त्यामागचे अर्थ समजून न घेता आंधळेपणाने ते फॉलो करणं हासुद्धा शुद्ध वेडेपणाच आहे.

मासिक पाळी ही खरंतर बायकांसाठी वरदान आहे. यामुळे शरीराचं रेग्युलर बेसिस वर cleansing होत असतं. पाळी येऊन गेल्यावर एकदम फ्रेश फीलिंग येणं हे त्याचंच द्योतक आहे. आणि हे माझ्यासकट सर्वच स्त्रिया अनुभवत असतील. पण या वरदानाला आपल्याकडे शापाचं रूप देण्यात आलंय. या विषयावर बोलणं सुद्धा निषिद्ध असणं, स्त्री या दरम्यान अपवित्र असते असं समजण ही सारी त्याचीच उदाहरणं आहेत. या अंधानुकरणातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सण-वार आले की बायकांनी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणं. त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊन menstrual सायकल पुर्णपणे disrupt होते. आणि स्त्रीचं एकूणच आरोग्य धोक्यात येतं.

आणखी एक fascinating गोष्ट म्हणजे चंद्र, सूर्य आणि इतर ग्रहांचा स्त्रीच्या पाळीवर होणारा परिणाम. प्रत्येक स्त्रीची पाळी ही एक तर अमावास्येच्या नाहीतर पौर्णिमेच्या आसपास असते. हा चंद्राचा menstruation वर होणारा डायरेक्ट परिणाम आहे. तो पुस्तकात सविस्तर उलगडून दाखवलेलाच आहे. पण ideally अमावास्येच्या 3-4 दिवस आधी आलेली पाळी healthy समजली जाते. यामागचा अर्थ अमावास्येनंतर प्रतिपदेपासून पुढचे दहा-बारा दिवस स्त्रीची fertile विंडो open असते. आणि हा काळ संततीधारणेसाठी सर्वोत्तम समजला गेला आहे हा असू शकतो. सूर्याचा होणारा परिणामही दृश्य आहे, उत्तरायण आणि दक्षिणायन सुरू होण्याच्या कालावधीमध्ये पाळीच्या patterns मध्ये कमालीचे उतार-चढाव दिसून येतात. याव्यतिरिक्त मंगळ हा ग्रहही यात महत्वाची भूमिका बजावतो. प्रत्येक स्त्रीमध्ये (जिची पाळी रेग्युलर आणि इन sync आहे) अॅक्चुअल menstrual फ्लो हा त्या दिवशी मंगळाची होरा (तास) चालू असतानाच्या कालावधी मध्येच सुरू होतो. हे मी माझ्या बाबतीत तपासून पाहिलं. चक्क खरं निघालं. हे सगळं निव्वळ थक्क करणारं आहे.

याचप्रमाणे प्राचीन हिंदू संस्कृतीत, स्त्रिया या दिवसात अपवित्र वगैरे नसून त्या जीविताच्या मूळ सृजन शक्तीच्या द्योतक मानून divine समजल्या गेल्या आहेत हेही पुस्तकात स्पष्ट केलेलं आहे. केरळ मधलं चेंगन्नुर भगवती मंदिर याचंच उदाहरण. तिथे चक्क देवीचं menstruation celebrate केलं जातं. त्याचा उत्सव होतो. आसाम मधलं कामाख्या देवीचं मंदिरसुद्धा असंच. तिथे दरवर्षी होणारा अंबुबाची उत्सव याच प्रकारचा आहे. आंध्र-प्रदेशातील देवीपुरम मधील कामाख्या पीठात periods चालू असणार्‍या स्त्रियांनाही प्रवेश आहे. याशिवाय स्त्रियांनी काही मंदिरात का जाऊ नये याचं लेखिकेने केलेलं विवेचनही अतिशय सुंदर आहे. त्यात discrimination चा गंधही नाही. उलट योगशास्त्र आणि कुंडलिनी चक्रांसोबत हे सारं कसं जोडलं गेलेलं आहे हे खोलात जाऊन समजावून सांगितलं आहे. त्यातलं सारंच या लेखात सांगणं शक्य नाही. ते वाचलं पाहिजे. प्रत्येकानेच.

मंदिरांची मूळ संकल्पनाच आपल्या धर्मात कुंडलिनी जागरणासाठी आहे. त्यांची रचनाही त्याचं दृष्टीने आहे. प्रतिष्ठापनेच्या वेळेला ज्या प्रकारचा प्राण (एनर्जि) मूर्तीत प्रतिष्ठापित केला जातो त्याच्या स्वरूपानुसार त्या-त्या मंदिरात प्रवेशल्यावर भक्तांचं ते-ते चक्र अॅक्टिवेट होतं. खालच्या इमेजमधून या चक्रांचा अंदाज येईल.यापैकी वरची तीन चक्रं अॅक्टिवेट करणार्‍या मंदिरांना मुक्ति प्रकारची मंदिरं म्हणतात. यात एनर्जि आज्ञा, विशुद्धी आणि अनाहत चक्रांकडे वळवली जाते. याचाच अर्थ खालच्या स्वादिष्ठान आणि मूलाधार चक्रांकडे एनर्जिचा पुरवठा कमी होतो. स्वादिष्ठान चक्र हे स्त्रीच्या ओवरीशी जोडलेलं आहे. अशा मंदिरात सातत्याने गेल्याने स्वादिष्ठान चक्राला कमी एनर्जिचा पुरवठा होऊन ओवरी रेलटेड प्रॉब्लेम्स उद्भवण्याची, इतकंच काय वंध्यत्व येण्याचीही शक्यता असते.

दूसरा एक मंदिरांचा प्रकार म्हणजे भुक्ती मंदिरं. इथे केवळ वरचीच नाही तर खालचीही तीन चक्रं अॅक्टिवेट होतात आणि अशा मंदिरात स्त्रियांनी जाण्याला हरकत नसते. हे अर्थात कल्पना येण्यापुरतं मी सांगतेय. विषय खूप मोठा आहे. काही विशिष्ट संस्कृत अक्षरे प्रत्येक चक्रावर परिणाम करतात. आणि त्यावरून विशिष्ट मंत्रांची रचना केलेली असते. कोणता मंत्र म्हटला की कुठलं चक्र उद्दिपित होतं याचेही संकेत आहेत. उदाहरणार्थ भुवह आणि स्वाह या स्वर व्यहर्ती, मूलाधार आणि स्वादिष्ठान चक्र उद्दिपित करतात. याची अनुभूती आपण स्वत:ही घेऊ शकतो. उच्चार करून बघा भुवह आणि स्वाह चा. नाभीच्या जवळ हालचाल झालेली तुमचं तुम्हाला जाणवेल.

ही जशी चक्रं आहेत तसेच पाच प्रकारचे वातही आपल्या शरीरात कार्यान्वित असतात. खालच्या इमेज मध्ये ते दर्शवले आहेत. यातला अपान वायू, menstrual/semen/waste secretion शी जोडला गेला आहे. म्हणजे या गोष्टी शरीराबाहेर टाकण्यासाठी शरीरातील अपान वायू कार्यान्वित व्हावा लागतो. आणि तो एकदा अॅक्टिवेट झाला की त्याच्या downward movement मध्ये बाधा येऊ नये म्हणून उदान वायू (जो upward मूवमेंटला करणीभूत असतो) अॅक्टिवेट करणार्‍या क्रिया (कूकिंग, जिथे अग्नि प्रज्वलित असतो आणि तो उदान वायू अॅक्टिवेट करण्यासाठी करणीभूत ठरू शकतो किंवा देवघराजवळ जाणं, जिथली एनर्जि सुद्धा ऊर्ध्वमूखी असते) त्या duration मध्ये करू नये असं सांगितलेलं आहे. अपान वायूच्या कार्यात सातत्याने बाधा येऊ लागली की तो कन्फ्युज होतो आणि दिशा बदलू लागतो. ओवरीज मध्ये होणार्‍या रक्ताच्या गाठी याचाच परिणाम असतात. ज्या पुढे गर्भाशय काढून टाकण्यापर्यंत सीरियस होतात. मॉडर्न मेडिकल सायन्स या गाठी का होतात याचं कारण अजून तरी देऊ शकलेलं नाही. स्ट्रेस हे एकच कारण ते देतात. आजकाल पीसीओडी आणि uterus काढून टाकण्याच्या operationsचं प्रमाण किती वाढलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे!या सगळ्याचा अर्थ, म्हणजे आता शिवा-शिव पाळायची की काय! असा प्रश्न मनात साहजिकच निर्माण होऊ शकतो. आताच्या काळात ते कितपत व्यवहार्य आहे हाही शंकेचाच विषय आहे. पण आपण ज्या कृती करतोय त्यांचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होऊ शकतो/होतो हे जाणून घेणं आणि मग कसं वागायचं ते आपलं आपण ठरवणं हे, एखादी कृती वाईटच आहे असं blindly म्हणणं किंवा blindly ती फॉलो करणं यापेक्षा नक्कीच कितीतरी पटींनी अधिक चांगलं आणि हितावह आहे. हा विषय खरंच खूप मोठा आहे हे आता जाणवतंय. अर्थात स्त्रियांना जाचक बंधनात बांधण्याचा किंवा तशा प्रथांना बळकटी देण्याचा हेतु यामागे अजिबात नाही. पण या विषयाचा अभ्यास व्हायला हवा, रिसर्च व्हायला हवा असं नक्कीच वाटतं. अंध-श्रद्धा जशी चुकीची आहे तशीच अंध-अश्रद्धाही चुकीचीच आहे हे मला आता उमगायला लागलंय. पुस्तक जरूर वाचा. लिंक खाली देतेय. एक वेगळीच वाट त्यात सर्वांसाठी उलगडून दाखवली आहे..

 

 

संजीवनी देशपांडे  


'Rtu Vidya' या पुस्तकासाठी खालच्या इमेजवर क्लिक करा..

टिप्पण्या

Tanuja म्हणाले…
Please post the link for the book.
It's an interesting article. In this 21st century, all the women have become super women or in the process of becoming one, juggling so many things simultaneously. In this process, we neglect the signals given by the body. If I have a choice, I would actually take 4 days rest during period. Our previous generations must have thought through the pain women have to go through during 4 days and that could be the reason women were given 4 days break from regular work. But as you mentioned correctly, we don't know the reasons for all these beliefs and then we start resisting it.
Very true Tanuja.. Thank you!
Link for book is given in the post itself (at the end)
अनामित म्हणाले…
For example, Wild Casino has a welcome bonus of $5,000 throughout a player's first 5 deposits. However, when playing in} video games on cellular, remember that the structure 온라인 카지노 could also be} barely completely different from desktop computer systems. In most cases, quick hyperlinks and other icons collapse to make room for the main playing in} space. As model new} player, find a way to|you probably can} declare a match bonus of a lot as} $5,000 in your first 5 deposits.

लोकप्रिय पोस्ट