संपी आणि तिचं धमाल जग
सहज मनात आलं म्हणून संपीची ही गोष्ट मी लिहायला घेतली. आणि पाहता पाहता तिचे ३६ भाग पूर्ण झाले. जवळपास ३०,००० शब्दांची ही माझी आजवरची सर्वात दिर्घ कथामालिका ठरली आहे. संपी आणि तिची गोष्ट सर्वांना आवडतेय, बरेच जण संपीशी रीलेट करू लागले आहेत, तिच्याशी जोडले जाऊ लागले आहेत हे पाहून खरंच खूप छान वाटतं.
या कथा-मालिकेत आता वेळ आली आहे आणखी एका स्वल्प-विरामाची. कथेचा दूसरा टप्पा ३६व्या भागापाशी संपतो. आता इथून पुढची कथा पुन्हा काही दिवसांचा अवधी घेऊन पोस्ट करायला सुरुवात करेन.
या मधल्या काळात, पुढच्या वीकएंड पासून 'दिगंत' कथामालिकेचा दूसरा सीझन सुरू करतेय. त्यातली रिया, संहिता, अनुराग आणि इतरही काही नवीन characters पुन्हा सगळ्यांना भेटायला येताहेत. त्यांचं भावविश्व, नाती, आणि पुढची कथा कशी उलगडत जातेय हे पाहणं रंजक असणार आहे..
भेटूया लवकरच.. :)
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
Please take it as my personal opinion.
स्वल्प-विरामा नंतर नेहमीच छान treat मिळते...
Could you please share the link of 'Digant'
Will miss Sampi and Mandar....!!!!
आकांक्षा, थॅंक यू :)
दिगंत : https://www.chaafa.com/2021/08/blog-post_7.html
मन कस्तुरी रे, संपी येईल लवकरच परत :)