सखी.. Meet The Real Life Sampi!!
तर मंडळी, तुम्ही सगळे संपीची खूप मनापासून वाट पाहताय याची मला कल्पना आहेच. संपी येणारच आहे. एका वेगळ्या-सुखद स्वरुपात ती लवकरच तुम्हा सर्वांना भेटायला येतेय. पण आजचं सर्प्राइज थोडंसं वेगळं आहे. आणि ते अधिक सुखदही आहे.

सर्प्राइज काय म्हणताय?

तर माझ्या संपीचा आज वाढदिवस आहे. आणि त्या निमित्ताने तिची तुम्हा सर्वांशी गाठ घालून देण्याचं मी ठरवलंय.

बुचकळ्यात पडलात?

Fictional character चा वाढदिवस?

मी समजू शकते. तुम्ही संपीला इतके दिवस माझ्या लेखणीतून भेटत आलात. पण मी मात्र या संपीला खूप पूर्वीपासुन ओळखते. आणि म्हणूनच तर इतकं सगळं भरभरून लिहू शकले.

तर, संपीची ही धमाल गोष्ट मला सुचण्यामागचं माझं इन्सपिरेशन असलेली, माझी जिगरी-खास-लाडाची, खूप खूप जवळची मैत्रीण.. संपी करते तसे सगळे वेडे-भन्नाट उद्योग करणारी, तरीही खूप निखळ, खूप गोड, full of life असलेली, संपी जिची कार्बन कॉपी आहे, ती..

Meet, Real Life Sampi उर्फ अपूर्वा..

फोटो मधली माझ्या सोबत असलेली violet beauty!

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि पहिल्या क्षणापासून आपली होऊन जातात. त्यातली अपूर्वा. कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटलेली वेंधळी, हसरी, गोड, जराशी लाजरी, जिच्या साध्या unintentional बोलण्यानेही विनोदाच्या फैरी झडायच्या (ज्या अजूनही झडतात 😉), मोठयाने उत्तरं घोकणारी.. आणि नंतरच्या आता दहा वर्षांहूनही अधिक लोटलेल्या काळासोबत अंतर्बाह्य बदललेली, evolve झालेली, स्व-भान आलेलीहां काही गोष्टी अजूनही तशा कायम आहेत. उदाहरणार्थ, ठरलेल्या वेळेहून दोन-एक तास तरी उशिरा तेसुद्धा उशीर का झाला याची भन्नाट स्टोरी घेऊन येणारी, अखंड बडबड करणारी, महत्वाच्या गोष्टी नेमकी विसरणारी.. अशी माझी अपूर्वा. 


(हा आमचा कॉलेज मध्ये असतानाचा फोटो. हा होस्टेलचा प्रिमाईस आहे. अचानक पाऊस पडायला लागला होता. खूप मोठा. मग काय आम्ही खूप भिजलो, फुगडी खेळली.. हाहा.. आणि नंतर दोन दिवस शिंकत राहिलो. आठवणी ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे)

तिच्याकडून मी खूप गोष्टी शिकलेही. ती माणूस म्हणून अत्यंत सुंदर आहे. Beauty With Brain! निखळ आहे. विचाराने वागणारी आहे. इतक्या वर्षात कुठल्याच बाबतीत कधीही अविचार करताना मी तिला पाहिलं नाही. सरळ-साधं-खरं-आणि सुंदर व्यक्तिमत्व. आणि अशी माणसं खरंच दुर्मिळ असतात. ती मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात आली आणि मला enrich करून गेली. अजूनही करते.

ती आहेच इतकी भन्नाट की मला तिच्यावरून काही सुचलं नसतं तरच नवल. खूप दिवसांपासून मनात घोळणारा हा विषय मी शेवटी यावर्षी लिहायला घेतला आणि संपीची गोष्ट घडत गेली. ही गोष्ट अर्थात fictional आहे. त्यातलं सगळंच काही खरं नाही. कथा फुलवण्याचा तो भाग आहे. हो, पण, संपी मात्र पूर्ण 100% खरी अपूर्वासारखी आहे. तिचं वागणं-बोलणं-विचार करणं सगळं अपूर्वासारखं आहे.

तर माझ्या या real life संपीला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!

Many Happy Returns Of the Day, Apurwa!!

अशीच रहा. Never lose your USP, your innocence!

खूप सारं प्रेम!

 

आणि आता संपीचं म्हणजेच अपूर्वाचं मनोगत तुम्हा सर्वांसाठी. अपूर्वा खरंतर खूप छान लिहते.. पण अशात तिने ते बंदच केलंय. 

(यात तिने माझं जरा जास्तच कौतुक केलंय, तिकडे दुर्लक्ष करणे ;) )

 

“नमस्कार!

 Hello!!

 Hola!!!

 Bonjour !!!

 

'संपी आणि तिचं धमाल  जग'  या  कथेचे सर्व भाग नुकतेच मी एका बैठकीत वाचून संपवले finally yay!

हे वाचून माझी छाती गर्वाने वगैरे फुगलीय कारण जिणे हे लिहलंय ती भन्नाट लेखिका माझी मैत्रीण आहे.

त्याचं काय झालं, संजूनी मला कॉल केला आणि ती म्हणाली की, ''तुझ्यावर मी गोष्ट लिहणारे!!''

हे ऐकून मी जागेवरच उडाले !

मी म्हटलं ''अगं! हे काय कारतीयेस तू?  त्यात लिहण्यासारखं काय आहे. Casual सगळं..  असं काही लिहलेलं आवडेल का तुझ्या चाफा फॅमिली मेंबर्स ना? खूप childish  वाटेल अगं.''

पण तिचं ठरलं होतं त्याप्रमाणे तिने 'संपीची स्टोरी रंगवली आणि अशी काय रंगवलीय की मीच वाचून स्पीचलेस झालेय.

हॅट्स ऑफ to  you  मॅडम!

आणि बघता बघता संपीचे ३६ भाग सुद्धा झालेय !! yo !

संपीला 'चाफा मेंबर्स च खूप प्रेम सुद्धा मिळतंय हे बघून दिल गार्डन गार्डन हो गया रे संजू !

खूप साधं सरळ सोप्पं पण तितकंच इंटरेस्टिंग लिखाण करणं हे खूप कठीण आहे पण तुला ते सहज जमत this is  युअर स्ट्रेन्थ!

संपीचे एक एक किस्से वाचणे म्हणजे  time  ट्रॅव्हलच आहेत माझ्यासाठी!

 केवढ्या त्या आठवणी अगं.. its like  jumping on ट्रॅम्पोलिन अँड हॅविंग goosebumps !!

खरंच हे फीलिंग खूप भारीय! मला ते शब्दात नीट मांडता नाही येणारे पण हां मी हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसलीय हॅहॅ :P

संजू, तू एक अशक्य सुंदर व्यक्तिमत्व आहेस आणि एक भन्नाट लेखिका !

"जें न देखे रवि, तें देखे कवि"

या  लाईन्स अगदी बरोबर आहेत याचा प्रत्यय तूच दिलास बघ. मला जी स्टोरी childish  वाटत होती ती तुझ्या ओघवत्या लिखाण शैली मुळे किती सुंदर वाटतीय अगं !!

कॉलेज च्या बेंच वर चारोळ्या लिहणारी तू आणि एक यशस्वी मराठी ब्लॉगर तू, हा तुझा अथ पासून इथं पर्यंत चा प्रवास खूप कमाल आहे.

तुझ्या सारखी गोड मैत्रीण मिळणं हे माझं भाग्य!

चाफ्याच्या फुलासारखाच तुझा ब्लॉग फुलत राहो आणि आम्हा सगळ्यांना अप्रतिम कन्टेन्ट रुपी सुगंध मिळत राहो हीच माझी wish !

ब्लॉगचं नाव जरी 'चाफा' असलं ना तरी तू मात्र माझी  'सोनचाफा' आहेस बरका :)

 

अजून खूप काही लिहावसं वाटतंय पण मला ते तुझ्यासारखं नीट लिहता नाही येत हाहा !

त्यामुळे इथेच थांबते जास्त लांबवत नाही!

thank  you  so  much to  you अँड ऑल चाफा members !!

अरे आणि खास तुझ्यासही २ लाईन्स मी dedicate करणारे,

आपल्या दोघींचे आवडते कवी बा भ बोरकर यांच्या त्या लाईन्स,

 

" देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे,

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे '!

 

लव्ह you

कीप smiling

 

 

 

फ्रॉम,

तुझीच अपूर्वा उर्फ संपी!

 

 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Ohh.. this surprise is really nice.
Have a bang Sampi.. Happy Birthday!!
Dreamer म्हणाले…
Yo.. happy birthday sampi!
अनामित म्हणाले…
Wow.. this gives a very nice feeling.
Loving a fictional character and then knowing it exists in real..
Thank you!
& Happy Birthday Sampi!
Hope you are celebrating your birthday with Mandar ;) :)
अनामित म्हणाले…
Belated Happy Birthday Sampi
शुभेच्छांसाठी सर्वांचे खूप आभार.. Thank You! :)
अनामित म्हणाले…
9 tarkhela yenar hoti na sampi?
अनामित म्हणाले…
Belated happy birthday sampi
Unknown म्हणाले…
संपिला खूप खूप शुभेच्छा, वाट बघतेय पुढील गोष्टींची
अनामित म्हणाले…
संपीची कथा परत कधी सुरू होणार....??? Eagerly waiting..

लोकप्रिय पोस्ट