शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

उत्तरायण, मकर संक्रांत आणि शुभेच्छा वगैरे..

 

तर त्याचं असं आहे की उत्तरायणाचा आणि मकर संक्रांतीचा सध्या तरी काहीही संबंध उरलेला नाहीयेपूर्वी तो होतापूर्वीम्हणजे३०० AD च्या आसपासआर्यभट्टाच्या काळाततेव्हाउत्तरायणाची सुरूवात आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश यादोन्ही घटना १४ जानेवारीला घडायच्याम्हणून हे मकर संक्रांतीचं महत्व


पण आताआता उत्तरायणाची सुरूवात होते २१/२२ डिसेंबरलाहे कसं शक्यय

आहेकारण पृथ्वीच्या Axial precession मुळे उत्तरायण दर ७० वर्षांनी एक दिवस आधी सुरू होतंत्यामुळेआर्यभट्टाच्या काळात एकाच दिवशी घडणाऱ्या या दोन घटनांमध्ये आता तब्बल २२-२३ दिवसांचा फरक आहे


संक्रांत काय दर महिन्यात येतेसूर्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला की त्याला संक्रांत म्हणतात अशा एकूणबारा संक्रांती असतातत्यातल्या मकर संक्रांतीचं महत्व हे तिच्या उत्तरायणाशी असलेल्या संबंधासोबत जोडलं गेलेलंआहेपण तो संबंध आता दूरचा होत चाललाय आणि उरली आहे ती निव्वळ प्रथा.


पणतरीही तिळ-गूळ खाणंएकमेकांकडे जाणंगोड बोला म्हणणंपतंग उडवणंवाण लूटणं यातली गम्मत निराळीचत्यामुळे ती मजा चाखायलाच हवीसोहलवा कमी आणि तिळ-गूळ जास्त खा आणि (मनापासूनतोंडदेखलं नको ;) ) गोड-गोड बोला :)


(We must Know our festivities, their reasonings and essence before just following the rituals 🙂)


सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 💐संजीवनी देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *