संपी आणि तिचं धमाल जग : भाग ३७ : Revisit!

 तू???’

नाई. माझं भूत!

अरे वा.. इतक्या लवकर भूत होशील असं वाटलं नव्हतं!

मंदारने डोळे बारीक करून संपदाकडे बघितलं. ओळखायला येऊ नये इतकी बदलली होती ती. मनात असलेली इच्छा एकदम अचानक ध्यानी-मनी नसताना पूर्ण व्हावी तसं त्याचं झालं. इतक्या वर्षात नव्या ओळखी झाल्या नाहीत असं नाही. त्या होतच राहतात. पण, अशी एखादी व्यक्ति सर्वांच्या मनात असते जी कुठे न कुठे, कधी न कधी आपल्याला नक्की परत भेटेल असं मनातून वाटत राहतं. आपली नजर आपल्याही नकळत तिला शोधत राहते. अनोळखी नंबर वरुन आलेला मिस्स्ड कॉल उगाच काळजाची धडधड वाढवतो. सोशल अकाऊंटस वरून सारखी बोटांची वारी फिरत राहते. पण ‘request’ पाठवताना मन घुटमळतं. कधी संकोच तर कधी इगो आडवा येतो. मागची काही वर्षं ही अशीच गेलेली असताना आज चक्क संपी डोळ्यांसमोर उभी!

क्षणभर काय बोलावं दोघांनाही सुचेना. मग नेहमी सारखं उगाच तिरकं वळण घेतलेलं संभाषण सुरू झालं होतं.

किती घाई गं तुला.. चिल! जाणारच आहे एक दिवस वर.

घाई आणि मला? तूच म्हणालास भूत वगैरे.. जग रे बाबा जग. भरपूर जग.

थॅंक गॉड. आता तू म्हंतेयस तर जगतो.. नाहीतर मरायचाच विचार होता 😉

संपदाने वरुन खालपर्यंत मंदारला पाहून घेतलं. ..तसाच बोलतो अजून तिरसटा सारखा. का समोर आलाय काय माहिती. आणि मी तरी का बोलत थांबलेय याच्याशी? पण आलाय कोणासोबत हा? लग्न केलं असेल? किंवा गर्लफ्रेंड वगैरे?.. ती मनातल्या मनात कुठे जाऊन पोचली.

इतक्यात, अरे मंदार चल नं, सगळे थांबलेयत म्हणत मगाच्या ग्रुपमधली एक मुलगी तिथे आली.

..खरंच जीएफ असेल?.. संपीच्या मनातला किडा पुन्हा वळवळला. ..छे! कोणी का असेना. आपल्याला काय? फरक पडतच नाही अजिबात..

काय गं कुठे हरवलीस?’

काही नाही.. चल मला कामं आहेत. यू कॅरि ऑन

अतिशय गडबडीत त्याला बाय करून ती तिथून निसटली. जवळपास धावत खाली आली आणि राधाला धडकता धडकता राहिली.

अगं काय? कुठे जातेयस इतकी धावत?’

काहीही उत्तर न देता संपदाने राधाला ओढून बाजूला नेलं. आणि खुणेनेच जिन्याकडे पहायला सांगितलं. वरुन मंदार आणि ती मुलगी येत होते. राधाने बघितलं पण तिला पहिल्यांदा काही कळलंच नाही.

कोण आहे?’ तिने संपदालाच विचारलं.

संपदाने मग वाकडी मान आणि हाताची घडी करून ‘seriously?’ अशा अर्थाने तिच्याकडे पाहिलं. राधाने पुन्हा वळून पाहिलं. आणि आत्ता तिची ट्यूब पेटली. मंदार!!!

अगं.. हा मंदार आहे!! किती बदललाय!!!

संपदाने नुसतीच मान हलवली.

तू बोललीस त्याच्याशी? त्याने पाहिलं तुला??’

अगं हळू बोल ना.. आणि तिकडे बघू नको अजिबात. अॅक्ट लाइक वी आर कूल अँड डोन्ट केअर

हाहा.. तू कूल वगैरे अजिबात वाटत नाहीयेस बरंका. हललीयेस आतून..

गप गं तू. काय वाटतं तुला? जीएफ असेल ती त्याची?’

कोण??’

ती गं.. सोबत नाहीये का त्याच्या?’

एव्हाना ते दोघे ग्रुप मध्ये जाऊन मिसळले होते. मंदार वळून वळून या दोघींकडे पाहत होता. बाकीचे सगळे गाडीत जाऊन बसल्यावर तो वळून पुन्हा परत संपदा थांबली होती तिकडे आला.

अग्गं तो इकडेच येतोय... नको बघूस तिकडे!! स्टे कूल. टॉक समथिंग एल्स.... हम्म... बरं, माझं पाहून झालंय सगळं. फक्त वरच्या फ्लोरवर थोडा ब्लॅंक पसेज आहे तिथे काय करता येऊ शकतं याचा विचार करतेय..

राधा थक्क होऊन संपदाच्या धांदलीकडे पाहत होती. एरवी इतकी कूल आणि सोर्टेड वागणारी ही मुलगी. आणि आज इतकी गडबडलीये? एवढ्यात मंदार तिथे येऊन पोचलाच.

कुठे काय करायचंय?’ तो.

सॉरी?’ उगाच आपण त्या गावचेच नाही असा आव आणत संपदाचा प्रश्न.

ते आत्ता काहीतरी बोलत होता ना तुम्ही.. ओह.. एक मिनिट, तू राधा ना?’

राधा तोंड उघडणार इतक्यात संपदाच उत्तरली.

इट्स नन ऑफ यॉर बिजनेस. आम्ही आमच्या कामासंदर्भात बोलतोय.

ओह ओके.. मी फक्त..

काही राहिलंय का तुझं? म्हणजे विसरलायस वर काही? नाही म्हणजे परत आलास म्हणून विचारलं. तिकडे बरेचजण खोळंबलेले दिसतायत तुझ्यासाठी!!

संपदाच्या वागण्याने अचंबित होऊन आणि मग विचारात पडून मंदार म्हणाला,

वेल, राहिलंय तसं बरंच. म्हणूनच आलो होतो. पण असो. यू कॅरि ऑन.. मी निघतो!

राधा त्याच्याकडे पाहून कसनुसं हसली. काय रेयक्ट व्हावं तिला कळतच नव्हतं. संपदा थांग लागू नये इतकी वेगळी वागत होती.

मंदार गेला.

काय पाहतेयस त्याच्याकडे? चल. कामं नाहीयेत तुला?’

संपदाचा आवाज तिच्याही नकळत चिरका झाला होता.

काहीही न बोलता राधा तिच्यामागे निमूटपणे गेली.

 

......

 

संपीला त्यादिवशी सिंहगडावरुन यायला तसा उशीरच झाला. हॉस्टेलमध्ये कोजागिरीची तयारी सुरू होती. कोजागिरी असूनही पाऊस पडल्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ होता. संपी आपल्याच तंद्रीत गेट मधून आत शिरली. कुंडीतल्या गुलाबावरुन हात फिरवून तिच्याही नकळत स्वत:भोवती गिरकी घेऊन ती आता कॉमन-रूमच्या पायर्‍या चढणार इतक्यात लक्ष नसल्यामुळे आतून येणार्‍या मीनलला जोरात धडकली.

संपे... ध्यान किधर है तेरा?? गिर जाती न मै! और थी कहा तुम इतनी देर?’

मीनल.... अग्ग.. तुला महितीय का! आज मंदारने प्रपोज केलं मला.. सिंहगडावर!! फुल्ल रोमॅंटिक अॅन ऑल..

काय???’

हो!’

हाहा.. मुझे पता था पेहलेसेही!

ए नाही हां. तेव्हा आमच्यात तसं काही नव्हतं

अच्छा हां क्या! आता आहे का मग तसं’.. हम्म?’

संपीने हम्म. हं.. म्हणजे.. हो.. तसं म्हणायला हरकत नाही. असं म्हणत हळूच हसत मान वळवली..

शरमा रही है तू?? ओह माय गॉड. तू तो बडी हो गयी यार!

ए गप गं. मोठी आहेच मी आधीपासून.

हो हो. महितीय बरंका संपी मॅडम. चला आत चला.. कामं आहेत. कोजागिरी प्लान की है सबने.

मीनलच्या गळ्याभोवती हात अडकवत मग संपी तिच्यासोबत आत गेली..

 

 

 

क्रमश:


नमस्कार मंडळी! कसे आहात? माझ्यावर चिडलेले आहात हे दिसतंच आहे 😉 संपीची गोष्ट अर्धवट सोडून मी एकदम गायबच झाले.

सध्या एका दुसर्‍या पुस्तकाचं काम चालू आहे. तो विषय थोडा जास्त जवळचा असल्यामुळे इकडे दुर्लक्ष होतंय. सॉरी!

आज माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून ठरवून लिहूनच काढलं. वाचा आणि कळवा कसं वाटतंय!

वेळेत लिहाण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण कधी नाही झालं तर थोडं समजून घ्या.

तुमचीच,

 

संजीवनी देशपांडे
टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Aree waah!!! Happy Birthday May the year to be come be an amazing one:)
On your special day treat all of us with the full fun-packed series of Sampee:p
And all the very best for your book...
अनामित म्हणाले…
Yippee. Sampi is back. Fun read this was.
Happiest Birthday Sanjeevani. May this next year give us a chance to meet Sampi frequently😉
12vi sci student म्हणाले…
Yay..happy birthday sanju didi
....love u and sampi always..
Suharsha म्हणाले…
Happy to see Sampada back...
Wish you a very happy birthday 🎂
Harshada म्हणाले…
Belated Happy Birthday Sanjivani...
Sampi parat ali ahe baghun mast watal.. chhan zalay ha hi bhag
गायत्री म्हणाले…
वाढदिवसाच्या शुभेच्छा संजीवनी!
या भागाची वाट पाहत पाहता पहिला सीझन 10एक वेळा वाचून काढला असेन मी. आता पुढचे भाग पण प्लीज लवकर पोस्ट करा!
Sanjeevani म्हणाले…
सर्वांचे खूप खूप आभार 😊
अनामित म्हणाले…
Waiting Waiting Waiting for next part
अनामित म्हणाले…
Pudhcha bhag???
अनामित म्हणाले…
Why so inconsistent Sanju Tai:(
क्रांती म्हणाले…
संपी परत आली आमची 😍

लोकप्रिय पोस्ट